Tuesday, October 13, 2026
Homeदेश विदेश३०५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट ठरली मृत्यूचा सापळा! १५ मुलांसह १३९ जणांचा...

३०५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट ठरली मृत्यूचा सापळा! १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू, ११६ जण बेपत्ता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पूर्व आफ्रिकेतील जिबूती देशाच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १५ मुलांसह किमान १३९ जणांचा मृत्यू झाला असून, सुरुवातीला ११६ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मृतदेह सापडल्याने बेपत्ता व्यक्तींचा सुधारित आकडा ८४ झाल्याचे आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (IOM) सांगितले आहे.

या बोटीमध्ये सुमारे ३०५ प्रवासी होते. ही बोट जिबूतीहून येमेनच्या दिशेने जात असताना ८ ते ९ ऑक्टोबरच्या रात्री उलटली. दुर्घटनेनंतर बचावकार्य राबवण्यात आले असून, ८० हून अधिक जण बचावल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

नावेत ३०५ प्रवासी; क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती
IOMच्या माहितीनुसार, ही नाव जिबूतीच्या पूर्व किनाऱ्यावरील ओबॉक शहराच्या उत्तरेला असलेल्या गुहेरे परिसरात उलटली. हा भाग एडनच्या आखाताजवळ असून, जिबूती आणि येमेन यांच्यामधील महत्त्वाच्या समुद्री मार्गाच्या परिसरात येतो. नावेत सुमारे ३०५ प्रवासी होते. बचावलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेत चढल्यानंतर ती मागील बाजूने पाण्यात बुडू लागली. नाव उलटण्यामागील नेमके कारण तपासले जात असले, तरी प्रवाशांची मोठी संख्या आणि समुद्रातील धोकादायक प्रवास यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गुंतवणूकदारांचा हिरमोड; सेन्सेक्सची जोरदार घसरण, उच्चांकावरून गडगडला

सुरुवातीला ११६ बेपत्ता; मृतांचा आकडा वाढल्यानंतर नवी माहिती
दुर्घटनेनंतर सुरुवातीला १०९ मृतदेह मिळाल्याचे आणि ११६ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आणखी मृतदेह मिळाल्याने मृतांचा अधिकृत आकडा १३९ वर पोहोचला आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या ८४ झाली. मृतांमध्ये १५ मुलांचा समावेश आहे. बचावलेल्या सुमारे ८२ प्रवाशांबाबतही माहिती दिली आहे. मृतांची ओळख पटवणे आणि बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. IOM आणि स्थानिक अधिकारी बचावलेल्या प्रवाशांना मदत करत असून, शोध व बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्थलांतरितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
जिबूतीजवळील ही दुर्घटना स्थलांतरितांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. रोजगार आणि सुरक्षित आयुष्याच्या शोधात निघालेल्या शेकडो प्रवाशांचा प्रवास मृत्यूच्या सावटाखाली संपला. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे आणि वाचलेल्यांना वैद्यकीय तसेच मानसिक आधार देणे याला सध्या प्राधान्य दिले जात आहे.

आफ्रिकेतील अनेक प्रवासी चांगल्या रोजगाराच्या आणि सुरक्षित जीवनाच्या शोधात जिबूतीमार्गे येमेनकडे जातात. त्यानंतर बाब-अल-मंदेब या समुद्रातील अरुंद मार्गातून प्रवास करून आखाती देशांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

हूतींचे बाब-अल-मंदेब परिसरात हल्ले सुरुच
बाब-अल-मंदेब परिसरात हूतींचे हल्ले सुरूच. दरम्यान बाब-अल-मंदेब आणि त्याच्या आसपासच्या भागात हूतींकडून सातत्याने हल्ले होत असल्याचं सांगितलं जातंय. बाब-अल-मंदेब हा समुद्रातील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गातून जहाजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय म्हणूनही या मार्गाचा वापर केला जातो.

ताज्या बातम्या

गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका! सांगली जिल्हा बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज बाद;...

0
सांगली | Sangali सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांना उच्च न्यायालयाच्या...