Saturday, July 27, 2024
Homeनगर11 हजार लिटर दूध, 509 किलो दही नष्ट

11 हजार लिटर दूध, 509 किलो दही नष्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात दुध भेसळ रोखण्यासाठी दुध संकलन केंद्र, प्रक्रिया प्रकल्पांच्या तपासणी मोहिमेत अन्न औषध विभागाने गेल्या 9 दिवसात चार लाख रुपये किंमतीचे 10 हजार 658 लिटर दुध, 509 किलो दही व 19 किलो तूप नष्ट केले आहे. यासह दुध भेसळ अथवा दुधाच्या दर्जाबाबत संशय आल्याने 41 दुधाचे नमुने घेवून ते पुढील तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे.

- Advertisement -

महसूल तथा पशूसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात दुधात होणारी भेसळीला पायबंद घालण्यासाठी 1 सप्टेबरपासून अन्न, औषध विभागाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या माहिमेत गेल्या 9 दिवसात घातलेल्या छाप्यात आणि तपासणीत 4 लाख रुपये किंमतीचे कमी गुण प्रतीचे दुध व दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. पशूसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार तसेच अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी व अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नारागुडे, समिती सदस्य अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खेरे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन प्रमोद काकडे व मनिष सानप, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र नितिन उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर दुध संकलन केंद्र, प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी तपासणी मोहिम अथवा धाडी घालण्यात आल्या. या धडक मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी गुण प्रतीचे आढळून आलेले 10 हजार 658 लिटर दुध, 509 किलो दही व 19 किलो तूपे नष्ट करण्यात आले. विविध तालुक्यातील नष्ट केलेल्या या दुध व दुग्धजन्य पदर्थांची किंमत चार लाख रुपये आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थाचे 41 नमुने पुढील तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.

तसेच वजन मापे प्रमाणिकरण व त्रुटी संदर्भात 12 ठिकाणी कारवाई तपासणी समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मोहिमांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, प्रदीप कुटे, डॉ. प्रदीप पवार व अश्विनी पाटील तसेच व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर व तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या