Friday, May 17, 2024
Homeधुळेअन्न व औषध प्रशासनातर्फे धुळ्यात दूध तपासणी मोहीम

अन्न व औषध प्रशासनातर्फे धुळ्यात दूध तपासणी मोहीम

धुळे । Dhule

अन्न व सुरक्षा मानदे कायद्यान्वये दूध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय संयुक्त पथकातर्फे आज दूध तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. एकूण 14 फिरते दूध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. मानदाप्रमाणे आढळून न आलेले 121 लिटर दूध नष्ट करण्यात आले. ही मोहीम यापुढेही सुरूच राहील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

अन्न व सुरक्षा मानदे कायद्यान्वये जिल्ह्यातील ज्या आस्थापनांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे, त्यांच्याविरुद्ध प्रशासनातर्फे कारवाई सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दूध भेसळीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरीय संयुक्त पथकातर्फे जीटीपी स्टॉप, देवपूर, धुळे येथे समितीचे सदस्य तथा सहाय्यक दुग्ध विकास अधिकारी विजय गरुड, दुग्ध शाळा रसायन शास्त्रज्ञ मनोज पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, नमुना सहाय्यक मंगेश भावसार, पोलिस नाईक विश्वनाथ शिरसाट, सहाय्यक आयुक्त श्री. कांबळे यांच्या पथकाने ही तपासणी मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेमध्ये 14 फिरते दूध विक्रेत्यांकडील नमुन्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. त्यात सहा विक्रेत्यांचे नमुने मानदाप्रमाणे आढळून आले नाहीत. त्यांच्याकडील 121 लिटर दूध नष्ट करण्यात आले. एकूण 613 लिटर दुधाची तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनातर्फे आगामी काळात अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येईल, असेही सहाय्यक आयुक्त श्री. कांबळे यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या