Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रAbdul Sattar : कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री सत्तारांचे...

Abdul Sattar : कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री सत्तारांचे पणन आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

नाशिक | Nashik

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Government) कांद्याचे दर वाढत असतांना निर्यात मुल्यात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर जिल्ह्यातील कांदा उत्पादक संघटनांसह अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) आक्रमक होत सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. यावेळी जिल्ह्यातील (District) अनेक संघटनांनी बंद पुकारला होता. तसेच संघटनांच्या या बंदला अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या (NAFED) मार्फत २४२० रुपये दराने कांदा खरेदीची घोषणा केली होती. परंतु, सरकारच्या या निणर्यावर कांदा व्यापारी समाधानी नव्हते.

Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यास महाराष्ट्राचे राजकारण ‘असं’ बदलणार; जाणून घ्या सविस्तर

यानंतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिनाभरापूर्वी कांदा व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत (District Collector) बैठक झाली. पण या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आज बुधवार (दि.२०) पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज जिल्ह्यातील कांदा लिलाव संपूर्णपणे ठप्प होते. यावर आता पणन मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली असून ऐनसणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश मंत्री सत्तार यांनी दिले आहेत.

Rahul Gandhi : महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा पण ओबीसी समाजाला…; राहुल गांधींची लोकसभेत मोठी मागणी

मंत्री अब्दुल सत्तार एका खाजगी कामासाठी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवला येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असतांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी (Traders) कांदा लिलाव (Onion Auction) बेमुदत बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य नाही. येत्या २६ तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, लिलाव बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पणन आयुक्त, सहकार आयुक्त तसेच नाशिक जिल्हाधिकारी (Collector) यांना दिले असून तशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री सत्तार यांनी दिली.

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; व्यापारी संपावर, ‘हे’ आहे कारण

दरम्यान, कांद्यावर निर्यात मूल्य आकारल्यानंतर त्याचा तोटा होत असल्याच्या कारणावरुन व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमधील लिलाव आजपासून बेमुदत बंद ठेवले आहेत. या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले असून आज कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. तसेच जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि मागण्यांवर चर्चा करत नाही, तोपर्यंत बाजार समित्या बंद राहतील असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला आहे. या संपामुळे आज सकाळपासून बाजार समित्यांमध्ये (Market Committees) शुकशुकाट पाहायला मिळाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण; पाहा Video

- Advertisment -

ताज्या बातम्या