Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHeavy Rain In Mumbai : मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री...

Heavy Rain In Mumbai : मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री अनिल पाटील, मिटकरी ट्रॅकवर

मुंबई । Mumbai

- Advertisement -

मुंबई (Mumbai) आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy Rain In Mumbai) सुरू आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुसळधार पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा (Railway) विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या (Local Train) रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहेत.

हे देखील वाचा : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई लोकल प्रमाणेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या आहे. सर्वसामान्यांची त्यामुळे आज मोठी गैरसोय होत आहे. आज विदर्भ एक्सप्रेस ने येणार्‍या अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि अनिल पाटील (Anil Patil) यांनाही या पावसाचा फटका बसला आहे.

मुंबई मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणार्‍या या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन रखडल्याने ट्रॅक वरून चालण्याची नामुष्की आली आहे. सकाळी पावणेदहाच्या दरम्यान या दोघांनीही चालत प्रवास सुरु केला. त्यानंतर पुढे उभी असलेली ट्रेन गाठली आणि त्यानंतर अधिवेशनात पोहचले. अनिल पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या