मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना आता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय कडून मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे.
सक्तवसुली संचालनालय भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोणतीही निविदा न मागवता ‘के.एस. चिमणकर एंटरप्राइजेस’ला कंत्राट दिले असा आरोप करण्यात आला होता. छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने असा दावा केला होता की, सरकारी कर्मचाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केला. विकासकाला १.३३ टक्के नफा होणार असल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात तो 365.36 टक्के होता, असा एसीबीचा आरोप होता.
सप्टेंबर २०२१ मध्ये विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की, विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाला 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तसेच एसीबीने केलेला नफा-तोट्याचा हिशोब अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. कंत्राटाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री आणि सात वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर गेला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सर्वांची दिशाभूल केली गेली, हे मान्य करणे कठीण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
Sanjay Raut: भास्कर जाधवांकडून शिंदेना सत्तेसाठी हात, पण राऊत म्हणतात, इतके वाईट दिवस…
कोर्टाने काय म्हंटले आहे?
ईडीने PMLA कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात आता भुजबळ यांची मुक्तता करण्यात आली आहे. PMLA कोर्ट न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी भुजबळांसहीत इतर ४० आरोपींची याचिका मंजूर केली आहे. महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार गुन्हा आधारावर ED ने याचिका दाखल केली होती. मात्र,मूळ गुन्ह्यात दोषमुक्त झाल्याने ED दाखल खटल्यात मुक्त करावे अशी मागणी भुजबळ यांच्या वतीने याचिकेत करण्यात आली होती. आम्हाला दोषमुक्त करा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
अखेरीस या प्रकरणी आज PMLA कोर्ट न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी याचिका मंजूर केली. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह ४० जणांची मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची मुक्तता करण्यात आली आहे. प्रेडिकेट ऑफेन्स नसेल तर ईडीची केसही उभी राहू शकत नाही, या आधारावर कोर्टाने मुक्ताची केली आहे.
काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथीत घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ हे दोन वर्ष जेलमध्ये देखील होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह एकूण 14 जणांची नावं होती. हा कथीत घोटाळा अंदाजे 850 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातं, या प्रकरणात आरोप झाल्यानं छगन भुजबळ चांगले अडचणीत आले, ते दोन वर्ष तुरुंगात देखील होते. मात्र त्यानंतर त्यांना या प्रकरणात आधी एसीबीकडून दोष मुक्त करण्यात आलं, त्यानंतर आता त्यांना ईडीने देखील दिलासा दिला आहे. ईडकडून देखील आता छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि इतरांकडून ईडीकडे निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता, तो आता ईडीने मंजूर केला आहे. भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.




