Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकबदलापूर घटनेनंतर पालकमंत्री भुसेंनी घेतली नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक

बदलापूर घटनेनंतर पालकमंत्री भुसेंनी घेतली नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक

नाशिक | Nashik

- Advertisement -

बदलापूर (Badlapur) येथील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या अध्यक्षेखाली जिल्ह्यातील शाळेतील सुरक्षांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांनी बदलापूरातील घटनेचा निषेध केला. यावेळी जिल्हाभरातील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik News : पोलिसांच्या मदतीने दोन बेपत्ता मुली सुखरूप घरी परतल्या

पालकमंत्री भुसे यांनी बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर नाशिक शहरातील (Nashik City) संस्थाचालक तसेच प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक आयोजित करून जिल्हाभरात काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी उपस्थितांनी काही सूचना देखील केल्या असून या सूचनांची दखल घेऊन तत्काळ अंमलबजावणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना भुसे यांनी प्रशासनाला (Administration) दिल्या आहेत.

हे देखील वाचा : Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात

दरम्यान, बदलापुरातील घटनेतील आरोपीला अटक (Arrested) केली आली असून संस्था चालकावर देखील कारवाई करण्यात आली आहे. तसेच दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या