Thursday, January 8, 2026
Homeनाशिकमंत्री भुसेंनी नाशिक-ठाणे महामार्गावरील रस्ते समस्यांचा घेतला आढावा

मंत्री भुसेंनी नाशिक-ठाणे महामार्गावरील रस्ते समस्यांचा घेतला आढावा

आठ दिवसांत परिणाम न दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

नाशिक | Nashik

नाशिकपासून ठाणेपर्यंत ट्रॅफिक आणि रस्ते समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार आज मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Thane Collector Office) बैठक पार पडली. या बैठकीसाठी एमएसआरडीसीचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन, आरटीओ आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : ‘या’ ९ जिल्ह्यांना IMD चा सतर्कतेचा इशारा; नाशिक, नगरमध्ये कसा असेल पाऊस?

YouTube video player

या बैठकीत हा विलंब कसा टाळता येईल, प्रवाशांना (Passengers) कमीत कमीत त्रास कसा होईल, याबबात नियोजन करण्यात आले. यासाठी वडपे ते ठाणेपर्यंत २३ किमी आणि नाशिक ते वडपेपर्यंतच्या ९७ किमीच्या रस्त्याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजवणे, पुन्हा खड्डे  होणार नाही याची काळजी घेणे, पूलांची चालू कामे लवकर मार्गी लावणे, या प्रश्नांबाबतदेखील चर्चा झाली. 

हे देखील वाचा : ठाकरे पिता-पुत्रांसह अजित पवारांना खोट्या प्रकरणांत अडकवण्यासाठी फडणवीसांचा दबाव; अनिल देशमुखांचे गंभीर आरोप

आसनगाव रेल्वे (Aasangaon Relway) पूलाचे काम प्रलंबित असून, त्यासाही आणखी ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने अस्तित्वात असलेल्या पुलाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय झाला. तसेच जिंदाल कंपनीजवळील फ्लायओवरचे काम, परिवार गार्डनजवळील पूल, इगतपुरी जवळील समृद्धी महामार्गाकडे जाणारा रस्ता, याबाबतही आजचया बैठकीत चर्चा झाली असून, लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

हे देखील वाचा : प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना, विमानात १९ प्रवाशी असल्याची माहिती

प्रलंबित पूलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून याठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही. याची काळजी घेणे. जड वाहनांना शहरात येणे-जाणे यासाठी वेळेचे बंधन लागू करण्यात आले आहे. ठाणेपासून वडपेपर्यंत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला १७० पोलिस मित्र देण्यात आले असून, त्यांना प्रभावी काम करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजे. जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेनमध्ये, लाहक वाहनांसाठी पहिली लेन खुली ठेवणे, याची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, येत्या ८ दिवसांत फील्डवर याचे परिणाम दिसून आले पाहिजे असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा :  मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला कडक शब्दात दिला ‘हा’ इशारा

दरम्यान, आठ दिवसांत याचे प्रभावी परिणाम दिसून आले नाही. तर, त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. ट्रॅफिक आणि रस्ते समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर पर्यटन करत असून, यासाठी नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी अशी विनंती मंत्री दादा भुसे यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...