नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) माध्यमातून राज्य शासन महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत. जिल्ह्यात योजनेचे साधारण ७ लाख २० हजार ८४४ अर्ज मंजूर झाले असून, या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसर्या स्थानावर असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पोलिस व प्रशासनाने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळल्याने पालकमंत्री भुसेंकडून कौतुक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे (Pune) येथील राज्यस्तरीय शुभारंभाबरोबरच जिल्हास्तरावरही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हाभरातून आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला बहिणी (Sister) मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : पालकमंत्री भुसेंनी घेतला बँकेतील महिलांच्या गर्दीचा आढावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. पालकमंत्री (Guardian Minister) दादा भुसे यांनी या योजनेच्या माध्यमातून राज्य शासन महिलांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील (District) महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांचे यावेळी पालकमंत्री भुसे यांनी अभिनंदन केले. तसेच ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्ट २०२४ नंतर अर्ज करतील, त्यांना देखील या योजनेचा सुरूवातीपासून लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापपर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी देखील योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : नराधमास जन्मठेप; बारा हजारांचा दंडही ठाेठावला
दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यातील सद्यस्थिती दर्शक माहिती सादरीकरणातून दिली. तसेच शेवटी सर्व तालुक्यातील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लाडकी बहीण योजनेच्या सर्व तालुकास्तरीय समित्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा