Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : धनंजय मुंडेंचा पाय खोलात! करुणा शर्मा उतरल्या मैदानात, थेट...

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा पाय खोलात! करुणा शर्मा उतरल्या मैदानात, थेट हायकोर्टात धाव, कारण काय?

मुंबई । Mumbai

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी महायुतीतील आमदारांसह विरोधी पक्षाकडून दबाव वाढत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंना अभय दिले. मात्र आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मांचा दावा आहे की त्यांचे धनंजय यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे. त्यांनी याचिका दाखल करुन गंभीर आरोप मंत्री मुंडेंवर केले आहेत. त्यामुळे मंत्री मुंडेंचा पाय पुन्हा खोलात गेला आहे.

करुणा शर्मा यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ३० ऑक्टोबर २०२४ रोजी फेटाळला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या मतमोजणीनंतर घोषित केले होते.

त्यानंतर करुणा शर्मा यांनी ४ जानेवारी २०२४ रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. आपण स्वतः १९९६ मध्ये धनंजय मुंडे यांच्याशी कायदेशीर लग्न केले होते. अधिकृत पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली.

मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्र ताब्यात घेतले. बऱ्याच मतदान केंद्रांवर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावू दिले नाहीत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान केंद्रावर प्रवेश करू दिला नाही. त्यांना मारहाण करून धमक्या दिल्या. तसेच ॲड. माधवराव जाधव यांना मारहाण केली. भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली, असे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. करुणा यांच्यातर्फे ॲड चंद्रकांत ठोंबरे काम पाहत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...