Monday, May 27, 2024
Homeराजकीयसत्तेत नसल्याने विरोधकांचा तोल सुटत चाललाय

सत्तेत नसल्याने विरोधकांचा तोल सुटत चाललाय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीच्या संकट काळात विरोधकांकडून सरकारला जे सहकार्य अपेक्षित होते, ते होत नाही.

- Advertisement -

छोट्या गोष्टी मोठ्या भासविण्याचा प्रयत्न होतोय. विरोधक लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत नसल्याने विरोधकांचा संयम सुटत चाललाय, अशी टीका जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केली आहे.

नगरमधील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. करोनाचे संकट हे राज्यात नव्हे तर देशात व जगात आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोव्हिड सेंटर, कोव्हिड हॉस्पिटल, रुग्णांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. विरोधक मात्र त्याच राजकारण आणत आणत आहेत. संकट काळात त्यांच्याकडून अपेक्षित ते सहकार्य मिळत नसल्याचे गडाख म्हणाले.

सत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होत आहे. आमच्याशिवाय राज्यात कोणाला सत्ता जमणारच नाही, अशी त्यांची भूमिका तयार झाली होती. त्यांच्या या भूमिकेला तडे जाताना दिसत आहेत. त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो आणि राज्य सरकार चालवू लागलो. त्यामुळे विरोधकांचा संयम सुटत असल्याचे ते म्हणाले.

कृषी विधयक केंद्र सरकारने बळजबरीने राज्यसभेत व लोकसभेत मंजूर करून घेतले. या विधेयकावर चर्चा झाली नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नाला उत्तर न मिळाल्याने भारत बंद सुरू असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयाने मराठा समाजाला दिलासा मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुशांत प्रकरणात राजकारण

सुशांतसिंह प्रकरणाबाबतची चर्चा ही आता दुसरीकडे भरकटली आहे. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी योग्य तपास करण्याचा प्रयत्न केला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले आहे. मात्र या प्रकरणावरून दुर्दैवाने राजकारण होताना दिसते. मुळात सर्वांनी एकत्र येऊन करोना मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करणे गरजेचे होते. पण तसं होत नाही व विरोधक लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही ना.गडाख यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या