Wednesday, May 29, 2024
Homeनगरकौठा येथे फुटलेल्या कालव्याची मंत्री गडाखांनी केली पहाणी

कौठा येथे फुटलेल्या कालव्याची मंत्री गडाखांनी केली पहाणी

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील कौठा येथे पावसाचे पाण्याने भराव खचून फुटलेल्या मुळा उजव्या कालव्याची आज राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पहाणी केली.

- Advertisement -

पावसाचे पाण्याने मातीचा भराव खचून वाहून गेल्याने व संरक्षक दगडी भिंत ही पडल्याने मुळा उजवा कालवा कौठा येथील गुप्त पुलाजवळ फुटलेला आहे. ना.गडाख यांच्या सुचनेनुसार लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अकला अहिरराव यांनी अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाने सादर केलेल्या दुरुस्ती प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिलेली आहे.

आज लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अकला अहिरराव, मुळा पाटबंधारेच्या प्रभारी कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभियंता प्रवीण दहातोंडे, महेंद्र राजगुरू, बाळासाहेब भापकर, पद्मसिंह तनपुरे व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी जाऊन पाहणी केली. ना.गडाख यांनी मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना कालवा व पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याबाबत निर्देश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या