पालघर | Palghar
गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा भागातील AIMIMच्या नगरसेविका सहर शेख यांच्या विधानावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पूर्ण मुंब्रा हिरवा करू, असे विधान त्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये विजयाचा आनंद व्यक्त करताना केले होते. यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झाले आहे. भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे, भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सहर शेखला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, हा रंगाचा वाद चांगलाच रंगला असून भाजप (BJP) नेते तथा मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी आपल्या सरकारमधील मंत्री आणि महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. मुंब्रा हिरवा करून टाकू,या सहर शेख यांच्या वक्तव्याची गणेश नाईक यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही दोन दिवसांपूर्वी मुंब्य्रात सहर शेखसह नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, केवळ मुंब्राच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असे त्यांनी म्हटले. त्यावरूनही, पुन्हा हिरवा आणि भगवा असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे.
Girish Mahajan : ” माझ्याकडून अनावधानाने…” त्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे. त्याचे आपण किती भांडवल करायचे असेल ते करू शकतो. आपण देखील भगवामय करून टाकू असे बोलतो,” अशा शब्दात गणेश नाईक यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. तसेच, इम्तियाज जलील यांना देखील कायदेशीररित्या आव्हान देऊ शकत नाही, आपल्या तिरंग्यात देखील हिरवा रंग आहे, असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले. दरम्यान, किरीट सोमय्या हे देखील भाजपचे नेते आहेत. मात्र, त्यांनी सहर शेखच्या वक्तव्याबद्दल मुंब्रा पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दिली होती. त्यानंतर, सहरला पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.
गणेश नाईक यांनी महायुतीतील नेत्यांना चांगलाच टोला लगावला. राजकारण करायचं असेल तर जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका, असे गणेश नाईक यांनी पालघरमध्ये आज प्रजासत्ताक दिनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले.





