Monday, January 26, 2026
HomeनाशिकGirish Mahajan : " माझ्याकडून अनावधानाने…" त्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांची पहिली...

Girish Mahajan : ” माझ्याकडून अनावधानाने…” त्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक | Nashik
नाशिकमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ध्वजवंदनाच्या सोहळ्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे एका महिला पोलिसांनी गिरीश महाजन यांना जाब विचारल्याने गोंधळ उडाला.पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित महिला पोलिसानं घेतला होता.या सर्व प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.तर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हंटले?
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळी असे काही होत नाही. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Nashik News: “मला सस्पेंड केलं तरी चालेल,पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही”; महिला पोलिसाचा गिरीश महाजनांसमोर संताप

नेमका प्रकार काय घडला होता?
पालकमंत्री गिरीश महाजन हे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचारी माधवी जाधव या म्हणाल्या की, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. मंत्र्यांची चूक आहे. मी माफी मागणार नाही. मंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते, असे त्यांनी म्हटले.

माधवी जाधव पुढे म्हणाल्या की, बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...