नाशिक | Nashik
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.२३) रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, हिरामण खोसकर यांच्यासह भाजपचे (BJP) आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या दौऱ्यावेळी गिरीश महाजन यांच्या झालेल्या एका कृतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.२३) रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भेट देऊन पाहणी करणार असल्याने या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) नाशिकमध्येच होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला वेळोवेळी सूचना करण्याचे काम केले. मात्र, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघत असताना मंत्री गिरीश महाजनांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
मंत्री गिरीश महाजन आज सकाळी माध्यमांशी (Media) संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची वाट बघत असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळताच मंत्री (Minister) गिरीश महाजन हे धावत मुख्यमंत्र्यांपर्यंत (CM) पोहचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या या धावपळीची चांगलीच चर्चा रंगली आहे.