नवीन नाशिक | प्रतिनिधी
नवीन नाशकातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये मंत्री गिरीश महाजन त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा ड्रक्स सेवन करतानाचा व्हिडिओची चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर तिदमे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन मंत्री महाजन यांना हमरीतूमरी केली. यामुळे चुंबळे विरुद्ध तिदमे यांचा संघर्ष अधिक पेटल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने एकमेकांना डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यात तिदमे यांच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तिदमेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने महाजन यांना हमरी तुमरी करण्यात आली. यावेळी मंत्री महाजन यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने दोन्ही बाजूने हातापाईचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात हिरवे गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेच्या ठिकाणी दाखवला गेलेला व्हिडिओ हा मॉर्फ करून लावला होता. चुंबळे यांना दर निवडणुकीत असे खालच्या पातळीचे राजकारण करावेसे वाटते. त्यामुळे त्यांनी असे केले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.
– प्रवीण तिदमे, शिवसेना महानगर प्रमुख
प्रभाग 24 मध्ये युवक व्यसनाधीन होत आहे. यांचा आका कोण हे समजणे देखील गरजेचे आहे.
– कैलास चुंबळे, उमेदवार




