वरणगाव, ता.भुसावळ Bhusawal
वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले व शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅक मध्ये उंचावर जंप मारून चढले मात्र ट्रॅकचा वरचा रॉड थेट डोक्याला मार लागून जखमी झाले.
त्याच स्थित मंत्री महाजन यांनी शाहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केले व अभिवादन केले मंत्री महाजन ट्रॅक वरून खाली उतरले. डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे कामगार नेते मिलिंद मेढे भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी शेख आखलाक यांनी आग्रह करून तातडीने हॉस्पिटल मध्ये नेले डॉ.पाटील यांनी उपचार केले.
मंत्री गिरीश महाजन यांनी जखमी अवस्थेतच शहिद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नीला व परिवाराला जाऊन भेटले व सांत्वन केले. मी व राज्य सरकार बाविस्कर यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे असे अभिवाचन दिले. मंत्री महाजन यांच्या डोक्याला जबर मार लागला असतांना सुद्धा पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कल पर्यंत चालत गेले तिथे हजारो वरणगाव करांच्या उपस्थित मानवंदना दिली. डॉ.पाटील यांनी उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारत तातडीने नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मला जावे लागणार आहे असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले आहेत.