Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याNanded Hospital Incident : "एक-एक मृत्यूचा हिशोब देणार"; नांदेडच्या घटनेवर मंत्री हसन...

Nanded Hospital Incident : “एक-एक मृत्यूचा हिशोब देणार”; नांदेडच्या घटनेवर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

नांदेड (Nanded) येथील विष्णूपुरीमधील (Vishnupuri) डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Dr. Shankarao Chavan Government Medical College and Hospital) काल सोमवार (दि.०२ ऑक्टोबर) रोजी २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश असल्याची माहिती दिली आहे…

- Advertisement -

Hospital Incident : नांदेडनंतर आता ‘या’ रुग्णालयात २४ तासांत १० जणांचा मृत्यू

या घटनेनंतर आता विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ नांदेडकडे रवाना झाले असून थोड्याच वेळात ते नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधी मंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी (Media) संवाद साधत घडलेल्या घटनेवर भाष्य केले.

Nashik Road News : नानेगावला बिबट्या जेरबंद; पाहा Video

यावेळी ते म्हणाले की, रुग्णालयात जे मृत्यू (Death) झाले आहेत त्याची सखोल चौकशी करू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याठिकाणी स्टाफ पुरेपूर होता. औषधांचा साठाही पुरेसा होता, पण गंभीर अवस्थेत रुग्णांचे दाखल होणे, खूप वेळाने अॅडमिट होणे, सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होणे, अपघातग्रस्त रुग्ण दाखल होणे, अशा प्रकारचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे या घटना घडल्या, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दिल्लीतील पत्रकारांच्या घरी छापे; चीनकडून निधी मिळाल्याचा आरोप

तसेच पुढे ते म्हणाले की, या घटनेमुळे विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मी तर दोन महिन्यांपूर्वी आलेला माणूस आहे. मी पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याचीही काळजी घेईल. तसेच या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून प्रत्येक मृत्यूचे कारण स्पष्ट जाणून घेतले जाणार आहे. तर यातील दोषींवर (Guilty) सरकारकडून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय एक-एक मृत्यूचा देखील मी हिशोब घेणार असून मृत्यू कसा झाला, काय झालं आणि कोण कोण जबाबदार आहेत याची माहिती घेण्यात येईल असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

धक्कादायक!! २४ तासांत २४ मृत्यू; नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव

- Advertisment -

ताज्या बातम्या