नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवकाळीमुळे (Unseasonal Rain) राज्यात एकूण २७ हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक फटका अमरावतीला (Amravati) बसला असून सुमारे १३ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर नाशिकमध्ये सुमारे पाच हजार ८५० हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे खरीपपूर्व हंगाम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना कृषीमंत्र्यांनीही माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, “गत दहा दिवसांपासून राज्याला अवकाळीचा फटका बसत आहे. पुणे,अमरावती,कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव यासह आदी जिल्ह्यांना अवकाळीने चांगलेच झोडपून काढले. खरीप हंगाम तोंडावर असतांना अवकाळीच्या फट़क्यामुळे शेतकर्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ताबडतोड पंचनामे करा”, असे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.
तसेच अवकाळी सुरुच असल्याने शेतीपिकांचे (Agriculture Crops) पंचनामे करण्यास विलंब होत आहे. फळपीकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, हे नुकसान त्वरीत लक्षात येत नाही. यामुळे पंचनामे करण्यास उशीर होत आहे. तरीदेखील आठवड्याभरात पंचनामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती देखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी (Minister Manikrao Kokate) दिली.
तर पीकविम्याचे पैसे शेतकर्यांना त्वरीत मिळत नाही याबाबतीत कृषीमंत्री म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM) बोलणी सुरु असून यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. शेतकर्यांना नुकसानीचे पैसे लवकर मिळावे ही शासनाची भूमिका आहे. पैसे विलंबाने मिळत असल्याने शेतकर्यांचे अधिक नुकसान होते. शेतकर्यांना खरीपपूर्व किंवा रब्बीपूर्व हंगामात पैसे मिळाल्यास त्यांचा भांडवली खर्चासाठी उपयोग होईल यासाठी त्यांना त्वरीत पैसे (Money) मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही कोकाटे यांनी म्हटले.