मुंबई | Mumbai
राज्यात एकीकडे अशोक खरात प्रकरण तापलेले असतानाच दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवाळांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्यासोबत तृतीयपंथी पवन यादव या व्हिडीओमध्ये दिसत असून या व्हिडीओवरून विरोधकांनी झिरवाळ यांच्यावर आणि सरकारवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणात ट्विस्ट आला असून या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पवन यादव यांनी स्वतःच्या भावाविरुद्धच मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भावाविरोधात त्यांनी ‘ब्लॅकमेल’चा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथी पवन यादवच्या भावावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीयपंथीच्या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनामध्ये मध्ये नोकरी लाव नाहीतर व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी पवनाला देण्यात आली होती. एफआयआरमध्ये अशाप्रकारची नोंद करण्यात आली आहे.
Nashik Rain News : दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात गारांसह पाऊस; निफाड, सिन्नर, बागलाणला अवकाळीचा फटका
भावाने ब्लॅकमेल केले आणि मूळ व्हिडिओ जाणीवपूर्वक ‘एडिट’ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तक्रारदार व्यक्तीने पोलिसांत केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी BNS कलम ७९, ३५१(१) आणि IT Act नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गोपनीयतेचा भंग आणि बदनामी केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मंत्री नरहळी झिरवाळ यांचा तृथीयपंथीय पवन यादव या व्यक्तीसोबत व्हिडिओ चर्चेत आला. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, व्हायरल व्हिडिओ दोन-तीन व्हिडिओ जोडून तयार करण्यात आल्याचा आरोप मंत्री नरहळी झिरवाळ यांनी केला. त्यामुळे, नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ खरा आहे की खोटा? याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नरहरी झिरवाळ यांनी हा व्हिडिओ बनावट असून अनेक क्लिप्स जोडून तो तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कायदेशीर पावले उचलली आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, व्हिडिओचे मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. या नव्या वळणामुळे झिरवाळ यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




