Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane: मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंना १ वर्षाचा कारावास, नेमकं प्रकरण...

Nitesh Rane: मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंना १ वर्षाचा कारावास, नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai
मुंबई-गोवा महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सोमवारी (दि. २७ एप्रिल) निकाल दिला. न्यायालयाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य २९ जणांची कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा) मधून निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना दोषी ठरवून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

नेमकं प्रकरण काय?
नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना ४ जुलै 2019 मध्ये उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 504 कलमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास व 1 लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे.

- Advertisement -

अजित पवारांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवारांमध्ये; राष्ट्रवादीतील नेत्याचं मोठं विधान

तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार अशी माहीती नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बहुतेक कलमांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुक्तता झाली असली तरी कलम 504 (सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग) अंतर्गत त्यांना १ महिन्याचा कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्या शिक्षेविरोधात ते रिव्हिजन दाखल करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

पडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

0
मुंबई । Mumbai NEET आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोळ ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवरही पेपरफुटीचे गंभीर सावट पसरले आहे. अन्न व औषध...