Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यमंत्री बच्चू कडु यांना 'मातृशोक' !

राज्यमंत्री बच्चू कडु यांना ‘मातृशोक’ !

मुंबई | Mumbai

प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडु (Minister of State Bacchu Kadu) यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु (Indirabai Kadu) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. इंदिराबाई यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बच्चू कडु यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

- Advertisement -

माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मातोश्रींच्या पार्थिवावर उद्या रविवार १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चादुंर तालुक्यातील बेलोरा या गावी सकाळी १० वाजता अंत्यविधी होईल, अशी माहिती कडु यांनी दिली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी प्रथमच राज्यमंत्री मंडळात शपथ घेतली त्यावेळी मातोश्री इंदिराबाई कडू या प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच बच्चू कडू निवडणुकीच्या प्रचारात असताना त्या नेहमीच सोबत राहत होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या