Friday, May 3, 2024
Homeराजकीयकृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना करोनाची लागण

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना करोनाची लागण

देशासह राज्यात करोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक मंत्री, नेते, कलाकार यांना देखील करोनाची लागण झाली आहे. आता राज्याचे कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांना करोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की,”धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी करोना पॉझिटिव्ह झालो.” तसेच “माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या योजना, कोरोना रोखण्यास उपाययोजना, मंत्रालय बैठका, भंडारा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज… संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास!” असे त्यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातील अनेक नेते बाधित

सांगली जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदारांना कोरोनाचा विळखा बसला आहे. यातून अनेकजण करोनमुक्त झाले आहेत. आत जिल्ह्यातील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील आ. सुधीर गाडगीळ, आ. विक्रमसिंह सावंत, आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याने पलूस – कडेगाव मतदार संघात खळबळ उडाली आहे.

मंत्री तनपूरेंचे काळजी घेण्याचे आवाहन

मंत्री प्राजक्त तानपुरे यांनी ट्विट करत कदम यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की,”काळजी घ्या ! महाराष्ट्रातील आपले अनेक कार्यकर्ते आणि माझ्या सारख्या सहकाऱ्यांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत.”

- Advertisment -

ताज्या बातम्या