Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकPankaja Munde : "...तर आपला एक वेगळा पक्ष उभा राहील"; मंत्री पंकजा...

Pankaja Munde : “…तर आपला एक वेगळा पक्ष उभा राहील”; मंत्री पंकजा मुंडेंचे नाशकात मोठे विधान

नाशिक | Nashik

श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन आज राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी शेतकरी (Farmer) बांधवांना संबोधित करतांना पर्यावरण, नद्या पुनर्जीविताचा विषय ते महाराष्ट्रात भाजप (BJP) रुजविण्यात गोपीनाथ मुंडे यांचे योगदान अशा विविध विषयांवर भाष्य केले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “गोपीनाथ मुंडेंवर (Gopinath Munde) प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर वेगळा एक पक्षच उभा राहील. गोपीनाथ मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची एवढी मोठी संख्या आहे. मुंडेंसाहेबांवर प्रेम करणारे आणि माझ्याबरोबर जोडले गेलेले लोक हे केवळ मी मुंडेंसाहेबांची मुलगी म्हणून माझ्यासोबत जोडले जाऊ शकले नसते. लोक गुणाचा वारसा स्वीकारतात. लोकं मुंडेसाहेबांच्या गुणांवर प्रेम करतात म्हणून जसे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभाच आहे. मुंडेसाहेबांनी भाजपच्या जन्मापासून काम केले आहे तो उभा केला आहे”,असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे त्या म्हणाल्या की,”शहरीकरण आणि नागरीकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण (Protection of Environment) आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कुंभमेळ्यात आपल्याला चांगल्या कामांसह गोमातेचे संवर्धन करायचे आहे. तसेच बांधकाम करण्याआधी माझ्या परवानगी लागते त्यामुळे बांधकामाच्या आधी त्या ठिकाणी झाडे लावा. आपण ज्या भूमिकेतून काम करतो ती जगाला दिली पाहिजे”, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

दरम्यान, यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभाताई बच्छाव (MP Shobhatai Bachhav) नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) श्री स्वामी समर्थ विद्यापीठाचे गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे (Annasaheb More) भाजप नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : भाजपची काँग्रेस अन् MIM सोबत युती; मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई । Mumbai राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात सध्या अनपेक्षित युती आणि आघाडीचे नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. अकोट नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने एमआयएमसोबत हातमिळवणी...