Sunday, November 24, 2024
Homeनगरमी राजकारण सोडतो, अन्यथा तुम्ही सोडा

मी राजकारण सोडतो, अन्यथा तुम्ही सोडा

ना.विखे पाटील यांचे थोरातांना थेट आव्हान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करत व्यवस्था बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यामुळे माजी महसूल मंत्र्यांना आव्हान आहे की एकदा साईबाबांकडे या आणि बाबांच्या शपथेवर सांगा, भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आ.बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.

- Advertisement -

नगरच्या सहकार सभागृहात महसूल विभागाकडून आयोजित कार्यक्रमात आणि त्यानंतर पत्रकारांशी महसूलमंत्री विखे पाटील बोलत होते. नगर जिल्ह्यातील दोन महाभागांनी तलाठी भरती घोटाळ्यांवर माझ्यावर आरोप केले. त्यामध्ये माजी महसूल मंत्री आणि एक विद्यामान आमदार होते. त्यावेळी आम्ही विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला होता. परंतु संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना मोठी चपराक लागली आहे. याचे मला समाधान आहे, अशी टीका ना विखे पाटील यांनी केली. माझ्या माहिती प्रमाणे पूर्वीच्या महसूल मंत्र्याकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. मात्र, महायुती सरकारच्या काळात महसूलहस सरकारचा कारभार हा पारदर्शक पध्दतीने सुरू आहे.

यामुळे तलाठी पदाच्या नियुक्त पहिल्यांदा पारदर्शकपणे देण्यात आल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दुसर्‍यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो. याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. तसेच नगर शहराच्या विकासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहे. जिल्ह्यातील पहिला उड्डाणपूल नगर शहरात उभा केला. तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नाने हा पूल झाला. नगर शहरात तीन पुलांचा शब्द आम्ही दिला होता. आज भूमिपूजन करून तो शब्द आम्ही पाळला आहे. नगर शहरातील वाहतूक सुरळीत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकारचे काम उत्तमपणे सुरू आहे. कदाचित हे काम पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री यांच्या भेटीला गेले असावेत, अशी मश्चिकील टिपण्णी त्यांनी यावेळी केली.

उध्दव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. आधीच सत्ता गेल्याने ते दुखी असून आता सत्ता येणार नसल्याने दुखी आहेत. त्यातून त्यांचे वैफल्य दिसून येत असून त्यांनी भाजप नेतृत्वावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकाचा मी निषेध करतो, असे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग बनावट प्रमाणपत्राची होणार चौकशी
जिल्ह्या रुग्णालयात दिव्यांगाची बनावट प्रमाणपत्र आढळून आले आहेत. त्याचे गुन्हे दाखल होत नाही. असे विचारले असता मंत्री विखे म्हणाले, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मोठे प्रकरण पुढे आले आहे. सरकार त्याची चौकशी करत आहेत. जे बोगस प्रमाणपत्र दिले असतील किंवा आढळून येतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येणार असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या