शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भाजपच्या (BJP) लोकांना इडी (ED) किंवा सीबीआयचा (CBI) त्रास झाला नाही का? असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरात (Gujarat) राज्याचे मुख्यमंत्री (CM) असताना त्याकाळी सीबीआयकडून (CBI) मोठ्या प्रमाणावर त्रास दिला गेला याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना (Congress Leaders) नाहीये, का ? सीबीआय चौकशी (CBI inquiry) झाल्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी विचारले असता मोदी (PM Narendra Modi) नमस्कार करून निघून गेले, मात्र नवाब मलिकला (Nawab Malik) इडीने पकडले आणी मलीक बाहेर आल्यानंतर दोन्ही हात वर करून जल्लोष केला, जसे काही मी फारच बहादूरकी केली असे भासवले ही काय पद्धत आहे का ? अमित शहा (Amit Shah) यांना जेलमध्ये टाकले, मोदींचा छळ केला त्यावेळी अशा प्रकारे आम्ही आरोप केले नाही. सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi), लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची देखील चौकशी झाली तेव्हा आमचे सरकार नव्हते. हे राज्यातील तीन पक्षाच्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), शिवसेेनेच्या (Shivsena) सरकारला दिसत नाही. त्यामुळे यामध्ये बिलकुल सुडाचे राजकारण नसून केंद्रातील या स्वतंत्र संस्था असल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी सांगितले.
दरम्यान रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे काल रविवार दि.27 रोजी सकाळी शिर्डी येथे आले असतांना प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून या प्रश्नांकडे लक्ष विचलीत करण्यासाठी राज्यातील सरकार अशाप्रकारे आरोप-प्रत्यारोप करत आहे.खरतरं राज्यात ज्या योजना आहेत त्या चालू करायला हव्यात, हे योजना बंद करणारे सरकार आहे.आमच्या काळात देखील आरोप होत होते.परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून विकासाकडे लक्ष केंद्रित करत होतो. विकासापासून लक्ष विचलित करण्यासाठी आमच्यावर अशाप्रकारे आरोप हे सरकार करत आहे.यांचा नेता कोण हे प्रथम
त्यांनी सांगावे.2024 काय पण त्यानंतर आघाडीचे नेतृत्व कोण करणार असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. या राज्यातील शेतकर्यांकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे त्यामुळे इडा पिडा टळू दे पुन्हा या राज्यात शेतकर्यांचे राज्य येऊ दे असे साकडे साईबाबांना घातले असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात भाजपचे सरकार असतांंना मराठा समाजाला आरक्षण दिले होते.त्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आमच्या सरकारने वकिलांची फौज उभी करून पुरेसे पुरावे गोळा करून ते आरक्षण टिकवण्यामध्ये यश मिळवले. पण दुर्दैवाने आमचे सरकार गेले.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात यास चँलेंज झाले.तेव्हा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून कोर्टाला अपेक्षित पुरावे सादर केले असते तर हे आरक्षण टिकू शकले असते पण यांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही.म्हणून सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली.हे राज्य सरकारचे अपयश आहे.मराठा समाजावर त्यांनी अन्याय केला आहे.या सरकारने छत्रपती संभाजी राजांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याने त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला आमचा शंभर टक्के पाठिंबा असल्याचेही ते त्यांनी सांगितले.