Saturday, July 27, 2024
Homeनगरना. विखेंच्या क्रांतिकारी निर्णयाने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती - कैलासबापू कोते

ना. विखेंच्या क्रांतिकारी निर्णयाने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती – कैलासबापू कोते

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाच्या एका वर्षाच्या काळातच शिर्डी शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याने आगामी काळात रोज़गार निर्मिती बरोबरच धार्मिक पर्यटनाला मोठी गती येऊन शिर्डीसह नगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार असल्याचे शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी सांगितले.

- Advertisement -

शिर्डीत पत्रकारांशी बोलताना कैलासबापू कोते म्हणाले, आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या शिर्डी शहर आणि परिसराच्या विकासासाठी एमआयडीसी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिर्डी एअरपोर्ट विकासासाठी 600 कोटी मान्यता, शिर्डीत भाविकांसाठी गार्डन प्रकल्प, शिर्डी सौंदर्यीकरण, 80 कोटींचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आदी प्रकल्पांना मान्यता आल्याने शिर्डी शहर आणि परिसरात नवीन आर्थिक क्रांतीचे पर्व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केले आहे. त्याचा फ़ायदा राहाता तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी, व्यावसायिकांबरोबरच तरुणांच्या रोज़गार वृध्दीसाठी होणार आहे.

शिर्डीच्या विकासाला आजवर ना. विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून साई संस्थानकडून यापूर्वी शिर्डी शहरात पायाभूत सुविधा आणि विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्याने शिर्डीचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. शिर्डीच्या विकासाबरोबरच नगर जिल्ह्याच्या खोळंबलेल्या विकासाला गती मिळाली आहे. निळवंडे प्रकल्पाचा फ़ायदा जिरायत भागासाठी होणार आहे. तसेच नगर शहराच्या विकासाचा मार्ग खुला करण्यासाठी विळद परिसरात एमआयडीसीला मान्यता आली आहे.

महसुल, पशुसंवर्धन आणी दुग्धव्यवसाय या विभागांमार्फत गेल्या वर्षभरात महत्वाच्या घेतलेल्या निर्णयांचा लाभ राज्यातील लाखो लोकांना विखे पाटील यांनी मिळवून दिला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लम्पी संकटात सापडलेल्या जनावरांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय विखे पाटील यांनी घेतला. शिर्डी नजीक सावळीविहीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि राज्यातील पहिले पशु विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय शेतकरी हितासाठी उपयुक्त ठरणार आहे. दूध उत्पादकांना 34 रुपये भाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूलमंत्री विखे पाटील यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विकास आराखडा करताना रोज़गार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट मंत्री विखे पाटील यांचे आहे. शेती महामंडळाच्या जमिनीचा उपयोग लोकहितासाठी व्हावा यासाठी शिर्डीत औद्योगीक वसाहत करण्याचा निर्णय शिर्डीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे, असे कैलासबापू कोते यांनी सांगितले.

ना. विखे पाटील यांनी घेतलेले गतीमान निर्णय

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास या विभागांमार्फत राबवण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांतर्गत माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त गरजू नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. सलोखा योजना, सुधारीत वाळू धोरण, महाराजस्व अभियान, ई पीक पाहणी, कोतवालांच्या मानधनात वाढ, प्रलंबित अर्जांचा आढावा, दस्त नोंदी अपग्रेड होणार, धोरणात्मक निर्णय, 4 जी सेवा, नॉनस्टॉप दस्तनोंदणी, क्रीड़ा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 50 लाखांची तरतूद, महाराष्ट्र ज़मीन महसूल नियमात सुधारणा, सैन्यदलाच्या घरांचा प्रश्न मार्गी, दीड कोटी पशुधनांचे मोफत लसीकरण, नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन त्यासाठी 45 कोटी निधी मंज़ूर, अकोला येथे पदवी पशुवैद्यक महाविद्यालय मंजूर, शिर्डी येथे महापशुधन एक्स्प्लोरेशन आयोजन, महाराष्ट्र गो शाळा आयोगाची स्थापना, गोशाळांना अनुदान, मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळ स्थापन, दूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाईन, बोव्हाईन ब्रीडींग क़ायदा, आंतरवासीता भत्त्यात वाढ, विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाची निर्मिती, दुधाळ जनावरांच्या किंमतीत वाढ, कुक्कुट समन्वय समिती, फिरती भ्रुण प्रत्यारोपण तीन प्रयोगशाळांची स्थापना आदी निर्णय घेऊन या निर्णयांची अंमलबजावणी सुरु करून सामान्य जनतेला सरकारच्या योजनांचा लाभ दिला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या