Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती गठीत; समितीच्या प्रमुखपदी गिरीश महाजन

नाशिक कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती गठीत; समितीच्या प्रमुखपदी गिरीश महाजन

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असताना २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी मंत्री समिती गठीत केली. या समितीच्या प्रमुखपदी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनावर भाजपचा प्रभाव राहील याची काळजी घेतली आहे.

YouTube video player

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम तयार केला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मंत्री समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीवर सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. नगरविकास विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

मंत्री समितीत सदस्य म्हणून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आणि उदय सामंत या मंत्र्यांचा समावेश आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन या मंत्री समितीचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याचे नियोजन होईल, हे आता स्पष्ट झाले आहे.

मध्यंतरी कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत माहिती मागवली होती. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यावरून महायुतीत आखाडा रंगल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे मंत्री समितीचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...