Sunday, May 19, 2024
Homeनगरचौघा अल्पवयीन मुलांची एमआयडीसीत दहशत

चौघा अल्पवयीन मुलांची एमआयडीसीत दहशत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी परिसरात चार अल्पवयीन मुलांनी दहशत करत तरुणाला मारहाण केली.त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला तर नवनागापूर येथील तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरच्या दोन्ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ ते दहाच्या सुमारास घडल्या. सोमवारी (दि. 9) गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

सुरूवातीला तीन अल्पवयीन मुलांनी रात्री 9:20 वाजता एमआयडीसीतील मेघानंद मसाले कंपनीजवळ पंकज कुमार विलायती सिंग (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. जखमी सिंग यांनी एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास चौघा अल्पवयीन मुलांनी चोरीच्या उद्देशाने नवनागापूर येथील तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी कोतवाल संदीप बबनराव गाडेकर (वय 40 रा. नवनागापूर) यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या