Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमअल्पवयीन मुलीस पळवून नेणारा युवक अटकेत

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा युवक अटकेत

पीडित मुलीची सुटका || राहुरीतून घेतले ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शाळेच्या गेटवरून अल्पवयीन मुलीला (वय 15) पळवून नेणार्‍या युवकाला कोतवाली पोलिसांनी राहुरी बस स्थानकावरून ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. ओम गोपी झेंडे उर्फ ओमकार गायकवाड (वय 19 रा. अचानक चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. नगर शहरातील एका रिक्षा चालकाने त्यांची अल्पवयीन मुलगी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शहरातील एका शाळेत सोडली होती. दरम्यान, मुलगी शाळेत आली नसल्याचे शाळेतील शिक्षकांनी मुलीच्या आईला फोन करून सांगितले.

- Advertisement -

त्यांनी पतीला फोन करून मुलगी शाळेत गेली नसल्याची माहिती दिली. त्यांनी शाळेत धाव घेत चौकशी केली असता मुलगी शाळेत आली नसल्याचे सांगितले. यानंतर परिसरात मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सदर अपहृत मुलगी व तिला पळवून नेणारा युवक राहुरी बस स्थानक परिसरात आले आहेत.

पोलिसांनी तात्काळ राहुरी बस स्थानक गाठून दोघांना ताब्यात घेतले. मुलाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास कपिले करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, उपनिरीक्षक कपिले, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सूर्यकांत डाके, अमोल गाढे, अभय कदम, कुणाल खरात, सतीश शिंदे, अतुल काजळे, राहुल गुंडू यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या