Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमरूमवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

रूमवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीला (वय 17) रूमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चेतन संतोष सरोदे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) या तरुणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी झेरॉक्स काढण्यासाठी कॉलेजच्या बाहेर आली असता, चेतन सरोदे हा दुचाकीवर फिर्यादीच्या पाठीमागून आला आणि फिर्यादीस म्हणाला की, तु आता माझ्याबरोबर चल. त्यावर फिर्यादी म्हणाली, तुझा आणि माझा काही संबंध नाही. तु मला त्रास देऊ नको. त्यानंतर चेतनने फिर्यादीस शिवीगाळ करून बळजबरीने दुचाकीवर बसवून गांधीनगर, बोल्हेगाव येथील एका रूममध्ये नेले.

YouTube video player

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तु कोणाला सांगितले तर तुझे फोटो तुझ्या घरी व कॉलेजमध्ये व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी...

0
मुंबई । Mumbai राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल...