Thursday, January 8, 2026
Homeक्राईमअल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बोल्हेगाव परिसरात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. तिच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, संशयित म्हणून सुशांत अमोल ठोकळ (रा. बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करतात. त्या आपल्या कुटुंबासह बोल्हेगाव येथे राहतात. त्यांची अल्पवयीन मुलगी एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. चार महिन्यांपूर्वी तिचे आणि सुशांत ठोकळ याचे प्रेमसंबंध असल्याचे कुटुंबाला कळले होते.

- Advertisement -

त्यामुळे फिर्यादीने तिला समजावून सांगितले होते. त्यावेळी सुशांत ठोकळ याने त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता. दरम्यान सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजता फिर्यादी आणि त्यांचा मुलगा घरातील कामे आटोपून कामावर गेले. त्यावेळी मुलगी घरी एकटीच होती. मात्र, दुपारी 3.30 वाजता मुलगा घरी परतल्यानंतर त्याला ती घरात आढळून आली नाही. घर तसेच परिसरात शोध घेतल्यानंतरही तिचा काहीही थांगपत्ता न लागल्याने कुटुंबाने तिला शोधण्याचा प्रयत्न केला.

YouTube video player

यानंतर फिर्यादी यांनी सुशांत ठोकळच्या वडिलांना फोन करून विचारणा केली असता, सुशांतदेखील दुपारी तीन वाजल्यापासून घरी नसल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याचा फोनही बंद असल्याचे समजले. त्यामुळे सुशांत ठोकळ यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...