Saturday, March 29, 2025
Homeनगरअल्पवयीन मुलीची केडगावात आत्महत्या

अल्पवयीन मुलीची केडगावात आत्महत्या

राहत्या घरात घेतला गळफास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहत्या घरात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Minor Girl Suicide) केल्याची घटना सोमवारी रात्री केडगाव (Kedgav) उपनगरातील शाहुनगर, पाचगोडाऊन जवळ घडली. प्रांजल आनंद बराटे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रांजल बराटे हिने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री तिच्या नातेवाईकांच्या लक्ष्यात आला. तिला उपचारासाठी तिचे वडील आनंद बराटे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात साडेआठ वाजता नेले. दरम्यान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू (Death) झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर यांनी रूग्णालयात नेमणूकीस असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जी. जी. बोरूडे यांना दिली.

अंमलदार बोरूडे यांच्या खबरीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) सोमवारी रात्री पावणे दहा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रांजलने आत्महत्या का केली याची माहिती समजू शकली नाही. अधिक तपास पोलीस अंमलदार आनंद वाणी करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पारनेरचे भूमीपूत्र IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner पारनेर (Parner) तालुक्याचे भूमीपूत्र असणारे आयपीएस सुधाकर पठारे (IPS Dr. Sudhakar Pathare) यांचे शनिवारी अपघाती निधन (Accident Death) झाले आहे. तेलंगणातील...