Monday, February 23, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून बदनामी

Crime News : अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून बदनामी

पीडितेच्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीला (वय 17) लग्नाचे आमिष दाखवत तिचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून बदनामी केल्याची घटना केडगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य संतोष गायकवाड (पत्ता माहिती नाही) या तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सात महिन्यांपूर्वी फिर्यादीची इन्स्टाग्रामवर आदित्य गायकवाड याच्याशी ओळख झाली होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलिंग दरम्यान पीडितेचा खासगी व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने पीडितेकडे शारीरिक संबंधाची मागणी करत तिला धमकावण्यास सुरूवात केली. संशयित आरोपी कोणताही कामधंदा करत नसल्याचे समजल्यानंतर पीडितेने त्याच्याशी संपर्क तोडला होता.

YouTube video player

दरम्यान, पीडितेचा दुसर्‍या मुलासोबत साखरपुडा निश्चित झाल्याचे समजताच संशयित आरोपीने रागाच्या भरात तो खासगी व्हिडिओ पीडितेच्या होणार्‍या पतीला आणि नातेवाईकांना पाठवून दिला. यामुळे ठरलेला विवाह मोडला असून पीडितेच्या कुटुंबाची मोठी सामाजिक बदनामी झाली आहे. एवढेच नव्हे तर संशयित आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळही केली. या गंभीर प्रकारामुळे पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : दरोड्याच्या तयारीतील चौघांची टोळी जेरबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून...