Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारशिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार ; जि.प.शाळेचा मुख्याध्यापक निलंबित

शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार ; जि.प.शाळेचा मुख्याध्यापक निलंबित

नंदुरबार । Nandurbar

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी मंजूर निधी विद्यार्थ्यांना न देता 2 लाख 86 हजाराचा अपहार करणार्‍या जावदे त.ह.ता.शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्यात येणार आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर नझऋचड जपश्रळपश मंजुर निधी वर्ग करण्यात आला आहे. सदर निधी शाळेतील इयत्तानिहाय अनुज्ञेय विद्यार्थी अथवा त्यांचे पालक यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस प्रणालीद्वारे वर्ग करण्याचे निर्देश दिलेले आहे.

मात्र उपसरपंच व पालक जावदे त.ह. ता. शहादा यांच्या तक्रारीनुसार शहादा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांनी जि.प.शाळा जावदे त.ह. ता. शहादा येथे भेट दिली असता प्रभारी मुख्याध्यापक रजेसिंग कथू खर्डे हे दि.13 फेब्रुवारी 2023 ते दि.9 मार्च 23 पर्यंत गैरहजर असल्याचे आढळून आले. श्री.खर्डे यांच्या गैरहजेरीमुळे आर्थिक स्वरुपाचे दप्तर पहायला मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक निर्धी कश्याप्रकारे खर्च करण्यात आला हे समजू शकले नाही.

तथापी शाळा व्यवस्थापन समिती/उपसरपंच व पालक यांनी दिलेल्या तक्रारी नुसार व बॅकस्टेटमेंटनुसार दि.14 ऑक्टोबर 2019 धनादेश क्र.41168 रुपये 98 हजार, दि.4 जुलै 2022 धनादेश क्र.41179 रुपये 1 लाख 11 हजार व दि.13 फेब्रुवारी 2023 धनादेश क्र.41174 रुपये 77 हजार अशा एकुण 2 लाख 86 हजार रक्कमेचा संशयित अपहार केल्याचे दिसुन येत असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी सादर केला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी रजेंसिंग कथ खर्डे यांना जि.प.सेवेतून निलंबित केले आहे. तसेच त्यांच्याविरुध्द लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुख्याध्यापकांनी अद्याप सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्याच्या अथवा पालकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली नसल्यास किंवा सदर योजनेच्या रक्कमेसह इतर योजनांची रक्कम रोखीने काढुन अपहार केल्याचे निर्देशनास आल्यास तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे तक्रार सादर करावी, असे आवाहन श्री.गावडे यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या