मुंबई | Mumbai
मिस युनिव्हर्स ही गेली अनेक वर्ष जगभरात सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी सौंदर्य स्पर्धा आहे. नुकताच या स्पर्धेबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धांत आता माता आणि विवाहित महिलांना (Mothers and married beauties) प्रवेश देऊन स्पर्धेसाठी पात्रता वाढवत आहे, महिलांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. २०२३ पासून सुरू होणार्या स्पर्धेतील Miss Universe 2023 स्पर्धकांच्या पात्रतेसाठी वैवाहिक स्थिती आणि पालकांची स्थिती यापुढे निकष राहणार नाहीत.
मिस युनिव्हर्सच्या आयोजकांनी म्हटले आहे की, ‘लग्न हा महिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या त्यांच्या आयुष्यातील हा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. आम्हाला त्यांच्या यशात कोणत्याही प्रकारे अडथळा आणायचा नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.’
मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांसाठी, महिलांनी अनेक पायऱ्या गाठल्या पाहिजेत. प्रथम, त्या ज्या देशाच्या आहेत त्या देशातील सर्व अंतर्गत स्पर्धा पूर्ण करत त्यांना त्यांच्या देशाचे प्रतिनिधी व्हावे लागते. मिस युनिव्हर्स स्पर्धा युनायटेड स्टेट्ससह जगभरातील १६० हून अधिक प्रदेश आणि देशांमध्ये प्रसारित केली जाते.
भारताच्या हरनाझ संधूला मिस युनिव्हर्स २०२१ चा मुकुट देण्यात आला. पंजाबमधील हरनाज सिंधूने इस्रायलच्या इलात येथे झालेल्या ७० व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. हरनाज संधूच्या आधी, फक्त दोन भारतीयांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. १९९४ मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि २००० मध्ये लारा दत्ता.
मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड मधील फरक काय?
मिस वर्ल्ड ही स्पर्धा दरवर्षी महिलांसाठी आयोजित केली जाते. मिस वर्ल्डची सुरुवात १९५१ मध्ये युनायटेड किंगडममध्ये (united kingdom) झाली. ज्यामध्ये अनेक देशांतील महिला सहभागी होतात. यामध्ये त्यांचा सुंदर चेहरा, त्यांची देहबोली, त्यांची विनोदबुद्धी, त्यांच्या कलागुणांना न्याय दिला जातो, त्यानंतर ज्युरी सदस्य त्यांचे निकाल देतात. विश्व सुंदरी स्पर्धेत जास्त विजेतेपद ही युरोपियन महिलांना मिळाल्याचे दिसून येते.
तर मिस युनिव्हर्सला म्हणजेच जगत् सुंदरी म्हणतात, मिस वर्ल्ड सारखीच ही स्पर्धा दरवर्षी मिस युनिव्हर्स संस्थेद्वारे आयोजित केली जाते. ही वार्षिक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्समधील पॅसिफिक मिल्स या कंपनीने १९५२ मध्ये केली होती. १९९६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचे हक्क मिळवले. मिस युनिव्हर्स स्पर्धेत अमेरिकेच्या स्पर्धकांनी जिंकली आहे.