Saturday, May 25, 2024
Homeनगरमहावितरणच्या अधिकार्‍यांची आ. काळेंकडून खरडपट्टी

महावितरणच्या अधिकार्‍यांची आ. काळेंकडून खरडपट्टी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

विजेच्या (electricity) बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या असंख्य तक्रारी (Complaints) येत असून आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा (Hint) देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, अशा शब्दांत आ. काळे (MLA Ashutosh kale) यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली.

- Advertisement -

कोपरगाव (Kopargav) येथे गौतम बँकेच्या सभागृहात आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक (Meeting) घेऊन विजेच्या विविध अडचणींसंदर्भात आढावा (Review) घेताना अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. कोपरगाव शहर व मतदारसंघात (Kopargaon city and constituency) नागरिकांना विजेच्या बाबतीत अनंत अडचणी येत आहेत. कमी दाबाने होणारा वीजपुरवठा (Power supply), वारंवार जाणारी वीज व अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडली आहेत. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा (Power supply) व्हावा यासाठी अनेक रोहित्र मंजूर केले आहेत.

मात्र रोहित्र उभारणीचे काम घेतलेले ठेकेदार (Contractor) वेळेत काम पूर्ण करीत नसल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. अशा ठेकेदारांवर महावितरण कारवाई का करीत नाही? असा सवाल करून या ठेकेदारांना (Contractor) अभय न देता हे ठेकेदार काळ्या यादीत टाका. शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या लवकरात लवकर सोडवा. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून नवीन मंजूर झालेले रोहित्र लवकरात लवकर बसवा यापुढे नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधित अधिकार्‍याला भोगावे लागतील, अशी तंबी आ. काळे (MLA Ashutosh kale) यांनी उपस्थित महावितरणच्या अधिकार्‍यांना दिली.

यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश मुळे, राहाता विभागाचे (Rahata Department) उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, अभियंता शिरीष वाणी, अति. कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राष्ट्रवादीचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या