अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेचे (Ahmednagar Municipal Corporation) पाच कोटी रुपये बुडवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र देणार्या बिल्डरांवर (Builder) गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) नगरमधील नागरिकांबरोबर आंदोलन करणार आहेत. महापालिकेत मी माझ्या पद्धतीने आंदोलन करेल व त्यातून येणारी सर्व जबाबदारी तुमच्यावर असेल, असा इशारा देणारे पत्रही आ. कडूंनी मनपा आयुक्त-प्रशासक डॉ. पंकज जावळे (Commissioner-Administrator Dr. Pankaj Jawale) यांना दिले आहे.
महापालिकेने खोटे प्रमाणपत्र देणार्या साई मिडास कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल न केल्यास तक्रारदार माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण, माजी नगरसेवक संजय घुले व माजी नगरसेवक गालिब सय्यद आणि नागरिकांच्या निवेदनानुसार महापालिकेत आंदोलन करण्यात येईल, असे पत्र नुकतेच आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. दूध संघाच्या जागेवर उभ्या राहिलेल्या इमारतीचे कम्प्लिशन सर्टिफिकेट घेण्यासाठी पाच कोटी रुपये भरल्याचे खोटे प्रमाणपत्र या कंपनीने महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation) दाखल केले आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळवल्याची बाब नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे निदर्शनास आली व महापालिकेनेही मान्य केली आहे.
याबाबत तक्रारदारांनी आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर आता सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे. या प्रकरणी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की सर्वसामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई केली जाते. आम्ही दिव्यांगांचे प्रश्न घेऊन पालिकेत गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. आणि महापालिकेत खोटे प्रमाणपत्र देऊन पाच पाच कोटी रुपये बुडवणार्या बिल्डरांवर कारवाई केली जात नाही व गुन्हे दाखल केले जात नाही. ही बाब लोकशाहीला घातक आहे. गरीबाला एक न्याय आणि श्रीमंत बिल्डर (Builder) यांना वेगळा न्याय याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी वागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने गुन्हा दाखल केला नाही तर कोणत्याही वेळी येऊन पालिकेत आंदोलन (Movement) करण्याचा इशारा (Hint) आमदार कडू यांनी दिला आहे.