Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरच्या विरोधात दंड थोपटणार; या प्रकरणी कायदेशीर नोटीस...

आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरच्या विरोधात दंड थोपटणार; या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवणार

मुंबई | Mumbai

माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे त्यांच्या बेधडक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. बच्चू कडूंच्या विधानांमुळे अनेकदा मित्रपक्षांची पंचाईत ही झाल्याचे दिसून आले आहे. आता बच्च कडू थेट सचिन तेंडुलकरला (Legal Notice To Sachin Tendulkar) नोटीस धाडणार आहे. ३० ऑगस्टला कडू त्यांच्या वकिलाकरवी तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत.

- Advertisement -

बच्चू कडूंच्या राजकीय धोरणांची माध्यमांमध्ये कायमच चर्चा असते. पण आता थेट भारतरत्न सचिन तेंडुलकरलाच ते नोटीस पाठवणार असल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra ने इतिहास रचला! पाकिस्तानच्या नदीमला हरवत ‘सुवर्ण’ कमाई

ऑनलाईन गेमची जाहिरात (Online Game Adverstisement) करणे मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याला भोवणार असल्याची चिन्हे आहेत. ऑनलाईन गेमची जाहिरात सचिन तेंडुलकरने केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना ३० तारखेला वकीला मार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

“भारतरत्न असणाऱ्या माणसाने कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू”, असे बच्चू कडूंनी नमूद केले. तसेच, “३० तारखेला पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करू”, असे सांगतानाच सचिन तेंडुलकरविरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले.

आठ महिन्यांत 12 हजार टवाळखोरांवर कारवाई

काय आहे प्रकरण

ऑनलाईन गेमचा दुष्परिणाम तरुण पिढीवर होत आहे. चारपाच मुलं एकत्र येऊन हा गेम खेळत आहेत. पालकांमध्ये चिंता आणि रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, अशी चेतावणी दिली जाते खरी. पण चेतवणी द्यायचीच कशाला? हा गेमच बंद करा ना. बऱ्याच राज्यांनी ऑनलाईन गेम बंद केला आहे. आपल्या राज्यातही तो बंद झाला पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

१५ दिवसांचा दिला होता अल्टीमेटम

राज्यात ऑनलाईन गेम बंद व्हावा म्हणून आम्ही सचिन यांच्या जाहिरातीला विरोध करत आहोत. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यामुळेच आमचा त्यांनी जाहिरात करण्यावर विरोध आहे. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केले नसते. सचिन यांनी जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना १५ दिवसांची मुदत देऊ आणि त्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत, असेही ते म्हणाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या