मुंबई | Mumbai
आमदार बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक अंदाजासाठी प्रसिध्द आहे. आत्ता ही त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यांनी आंदोलनाची घोषणा केली असून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावेळी देखील त्यांनी याच मुद्द्यावर सरकारवर संताप व्यक्त केलाय. ते येत्या २९ तारखेला आयोध्येला जाणार आहे. त्याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही हजारोंच्या संख्येने आम्ही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहोत. प्रभू रामाचे दर्शन घेणार आहोत. प्रभू रामचंद्रला कापूस,ऊस, संत्रा, तूर ,सोयाबीनचा प्रसाद चढवणार आहोत. या सरकारला बुद्धी दे, ही प्रार्थना प्रभू रामाकडे करणार आहोत आणि आर्थिक आरक्षणाची आम्ही लढाई सुरू करणार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान १५ ऑक्टोबरला मुंबईत बच्चू कडू यांनी मुंबईत ‘मेरा देश मेरा खून’ या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचा दुसरा टप्पा हा अयोध्येमध्ये होणार असल्याचे देखील यावेळी बच्चू कडू यांनी म्हटले. पुढे बच्चू कडू म्हणाले, आम्ही आर्थिक आरक्षणाची लढाई लवकरच सुरु करु. त्यासाठी आम्ही संपूर्ण भारत फिरणार. शहिदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मेरा देश मेरा खून’ राबवत आहोत. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिलेय.
राष्ट्रवादी किसान दलने आम्हाला आमंत्रित केले आहे. शहिदांचे स्मरण व्हावे आणि शेतकऱ्यांचे मरण होऊ नये यासाठी हे अभियान आम्ही राबवत आहोत. संत्राचा मुद्दा हा केंद्र सरकारचा आहे. बांग्लादेश संत्र्यावर आयात शुक्ल लावत असेल तर त्यांच्या मालावरही आपण लावावा, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
यावेळी देखील त्यांनी याच मुद्द्यावर सरकारवर संताप व्यक्त केलाय. आम्ही जे आंदोलन सुरु केलेय ते सरकारच्या बाजूने आहे की त्यांच्या विरोधात हे सरकारने शोधावे. आम्ही मागणी करत आहोत. सरकारमध्ये आहे म्हणून मागणी करू नये असा काही कायदा नाही. सरकारला जर वाटत असेल हे आंदोलन त्यांच्या विरोधात आहे तर त्याची कोणतीही तमा आम्हाला नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघात केला.