Monday, November 25, 2024
Homeनगरआमदार थोरातांनी केली प्रवरा नदीकाठ पूरस्थितीची पाहणी

आमदार थोरातांनी केली प्रवरा नदीकाठ पूरस्थितीची पाहणी

पूरस्थिती आणि गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

प्रवरा (Pravara), आढळा व म्हाळुंगी नदीच्या (Adhala River) पाणलोटक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे (Rain) तीनही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सर्व नागरिकांनी पूरस्थिती काळात अधिक सतर्क राहावे, असे आवाहन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी केले. त्यांनी रविवारी (दि. 25 ऑगस्ट) प्रवरा नदीकाठी (Pravara River) जाऊन पूरस्थितीची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

- Advertisement -

प्रवरा नदीकाठी साईनगर, नाईकवाडपुरा व प्रवरासंगम येथे जाऊन आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) व दुर्गा तांबे यांनी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी प्रशासन अधिकारी राजेंद्र गुंजाळ, पंकज मुंगसे आदिंसह स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणांच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तीनही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अशा काळामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. तरुणांनी नदीकाठी जाण्याचा किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा. याचबरोबर गणेशोत्सव (Ganeshotsav) काळातही अतिउत्साहीपणा न दाखवता अधिक काळजी घ्यावी असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी साईनगरमधील नागरिकांना जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलाची पाहणीही आमदार थोरात यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या