Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकChhagan Bhujbal : "माझे मंत्रिपद कुणी कापले, त्याचा शोध घेणार"; भुजबळ नाशिकमधून...

Chhagan Bhujbal : “माझे मंत्रिपद कुणी कापले, त्याचा शोध घेणार”; भुजबळ नाशिकमधून कडाडले

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. यात एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या (शिंदे गट) ११ आणि राष्ट्रवादीच्या (९) आमदारांचा समावेश होता. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी आज आपल्या नाशिकच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात राग आहे. मी आज कार्यकर्त्यांना मागील पाच-सहा महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकीपासून जे काही घडलं त्याचा इतिहास सांगितला. आता मी माझ्या मतदारसंघात जात आहे. माझ्या लोकांशी चर्चा करेन. राज्यभरातील कार्यकर्ते, समर्थक, समता परिषदेतील लोक उद्या मला भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका ठरवेन. परंतु, मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना सांगितलं आहे की तुम्हाला जो काही निषेध नोंदवायचा आहे तो शांतपणे करा. सर्वांच्या मनात निराशा आहे, परंतु मोबाईलवर व्यक्त होताना किंवा कुठेही प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना असंस्कृतपणे बोलू नका, शिवीगाळ करू नका, ‘चप्पल मारो’सारखं आंदोलन करू नका. लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठेही असंस्कृतपणा दाखवू नका. शब्द जपून वापरा”,असे त्यांनी सांगितले.

पुढे भुजबळ यांना माध्यम प्रतिनिधींनी तुमचं मंत्रिपद नेमकं कोणी नाकारलं? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी आग्रही होते. पंरतु, पक्षाने मला मंत्रिपद नाकारले.त्यामुळे माझे मंत्रिपद कोणी नाकारले ते शोधावं लागेल. तेच शोधण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. परंतु, हा निर्णय पक्षांच्या प्रमुखांचा असतो. म्हणजेच भाजपामध्ये कोणाला मंत्रीपद द्यायचं, नाही द्यायचं तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेबाबतचे निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) निर्णय अजित पवार घेतात. सर्वांनाच मंत्रिपद हवं असतं. परंतु,याठिकाणी प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे माझी अवहेलना करण्यात आली त्या अवहेलनेचा विषय आहे. त्या संदर्भात मी उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलेलं”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...