Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक मान्य होणार? सर्वोच्च न्यायालयात आज...

MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक मान्य होणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची देखील एकत्रित सुनावणी होणार आहे. या वेळी विधानसभा अध्यक्ष नवे वेळापत्रक सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नवे वेळापत्रक मान्य होईल का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांची दखल घेत मागील दोन सुनावण्यांवेळी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांची कानउघाडणी केली होती. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना दिले होते. सुधारित वेळापत्रक देण्यासाठी ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल, असे त्यावेळी खंडपीठाकडून सांगण्यात आले होते.

अध्यक्षांनी वेळापत्रक दिले नाही तर, आम्हीच वेळापत्रक देऊ आणि त्या वेळापत्रकाचे पालन करावे लागेल, असे सरन्यायाधीशांनी सुनावले होते. त्यामुळे नार्वेकर सुधारित वेळापत्रक देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यावर अध्यक्ष नार्वेकर कामाला लागले होते. आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांना ७ याचिकांमध्ये एकत्र करून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. याबाबतचा तपशील सोमवारच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला दिला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या