Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHiraman Khoskar : "मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा"...

Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर

नाशिक | Nashik

दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर झाला असून यात महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, विधानपरिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress MLA) काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या आमदारांवर कडक कारवाई केली जाईल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार; शुटरचा खात्मा

या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये कॉंग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे (Igatpuri-Trimbakeshwar Constituency) आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar) यांचाही समावेश असल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर येत आहेत. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर आमदार खोसकर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : परिमंडळ दाेनमध्ये सरप्राईज कॉम्बिंग; ७७ टवाळांवर कारवाई

आमदार खोसकर यांनी व्हिडीओमध्ये म्हटले की, “गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांच्याद्वारे सुरु असलेली माझी बदनामी वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन थांबवली पाहिजे. मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केलेली नाही. कॉंग्रेसच्या (Congress) कोणत्या आमदाराने कुठल्या उमेदवाराला (Candidate) मतदान करायचे हे ठरले होते. त्यानुसार काँग्रेसची ७ मते मिलिंद नार्वेकर यांना द्यायची आणि उरलेली मते शेकापच्या जयंत पाटील यांना द्यायची ठरले होते. त्यापद्धतीने नाना पटोले, कैलास गोरंट्याल आम्ही सगळे एकत्र गेलो आणि मतदान केले. उद्धव ठाकरे यांचे १६ आणि आमचे ७ अशी एकूण २३ मते होतात. एक मतं कुणाचे फुटले हे कोर्टाकडून आदेश घेऊन चेक करावे”, असे हिरामण खोसकर म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

तसेच “मी पहिल्या पसंतीचे मतं मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) दुसऱ्या पसंतीचे जयंत पाटील आणि तिसऱ्या पसंतीचे मतं प्रज्ञा सातव यांना दिले. त्यामुळे माझे मतं फुटले नसून मी व्यवस्थित मतदान (Voting) केले आहे. माझी नाहक बदनामी सुरु असून ती चुकीची आहे.जे आमदार फुटलेत त्यांच्यावर कारवाई करावी. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकद वरिष्ठांमध्ये नाही. माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर अन्याय केला जात आहे. पाहिजे तर पक्षातून माझी हकालपट्टी करा पंरतु, त्याआधी माझे मतदान चेक करून बघा”, असेही आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या