Tuesday, January 6, 2026
Homeराजकीयकाँग्रेसला धक्का! आणखी एक आमदार होणार भाजपावासी

काँग्रेसला धक्का! आणखी एक आमदार होणार भाजपावासी

मुंबई । Mumbai

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची (Assembly Election) मोर्चेबांधणी सुरू असतानाच राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा असून आज ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकांपासून जितेश अंतापुरकर हे पक्षाच्या रडारवर होते, अशातच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

YouTube video player

हे ही वाचा : खा. अमोल कोल्हेंना मोबाईलवरून शिवीगाळ; संगमनेरातून महसूल कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते.

जितेश अंतापूरकर हे देगलूर बिलोलीचे काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे ते सुपुत्र आहेत. कोरोना काळात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन झालं आणि देगलूर मध्ये पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. मात्र अशोक चव्हाण जेव्हापासून भाजपमध्ये गेले तेव्हापासून जितेश अंतापूरकर यांच्यावरही संशयाचा भोवरा होता.

हे ही वाचा : आता आरपारची लढाई होणार…; मनोज जरांगे पाटील यांनी दिला ईशारा

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...