Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMahendra Dalvi: दानवेंचा ब्लॅकमेलिंगचा धंधा…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार महेंद्र दळवींनी...

Mahendra Dalvi: दानवेंचा ब्लॅकमेलिंगचा धंधा…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार महेंद्र दळवींनी आरोप फेटाळले

नागपूर | Nagpur
ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात पैशांसह आमदार दिसत असल्याचे त्यांनी आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. या व्हिडीओत दिसणारे शिंदे गटाचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र या व्हिडिओशी माझा संबंध नाही. अंबादास दानवे यांचा ब्लॅकमेलिंग करणे धंदा आहे असे सांगत महेंद्र दळवींनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवला आहे-महेंद्र थोरवे
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांसोबतचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो. त्यांचे ठाकरे गटाशी साटेलोटे आहे. रायगडमधील सुनील तटकरे यांचे कुटीलनीतीचे राजकारण पाहता कदाचित त्यांनीच हा व्हिडीओ अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो. आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रुपाने आम्ही शत्रू पाळला आहे, असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.

- Advertisement -

त्यांचा ब्लॅकमेल करण्याचा धंदा, त्यांना पक्षात कुणी विचारत नाही
आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पोस्ट करावा. त्यात दिसणारा लाल टीशर्टवरील व्यक्ती कोण आहे त्याचा चेहरा दाखवावा. कुणाला तरी ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवे यांचा धंदा आहे. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता त्यांच्याकडे कुठले पद नाही. पक्षातही कुणी विचारत नाही. दानवे यांना गांभीर्याने घेत नाही. अधिकृत फोटोसह त्यांनी पुरावे घेऊन नागपूरात यावे हे माझं आव्हान आहे. मात्र एखाद्याची बदनामी करणे हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे. त्यांना कुणी सुपारी दिली हे त्यांनी सांगावे असे त्यांनी म्हटले आहे.

YouTube video player

तर मी आमदारकीचा राजीनामा देईन
तसेच माझी बदनामी करण्यासाठी असे कृत्य केले हे त्यांना कुणी सुपारी दिली हे सांगावे. त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन यापेक्षा आणखी काय सांगावे. तो व्यक्ती कोण हे लोकांसमोर आले पाहिजे. या व्हिडिओची सत्यता नाही. निवडणुकीतही असे प्रकार त्यांनी केले. अंबादास दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर कुठल्याही चॅनेलवर चर्चेसाठी यावे. मी समोर चर्चा करायला तयार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्याला मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे नक्की उत्तर देतील असेही आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.

सुनील तटकरे विरोधकांना हाताशी धरुन अनेक गोष्टी करतात
अंबादास दानवे यांना सुनील तटकरेंची साथ असू शकते. आम्ही तटकरेंच्या रुपाने घरात शत्रू पाळला आहे. शिवसेना-भाजप-रिपाई ही पारंपरिक युती असताना भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतले होते. त्याचा फटका आम्हाला रायगडमध्ये बसत आहे. सुनील तटकरे विरोधकांना हाताशी धरुन अनेक गोष्टी करतात. त्याप्रमाणेच त्यांनी आताही ठाकरे गटाशी साटेलोटे करुन महेंद्र दळवी यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा संशय महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवला. यावर आता सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...