Tuesday, March 25, 2025
Homeनगरहिंदूवर अन्याय करणार्‍यांचे हात, पाय उखडून टाका

हिंदूवर अन्याय करणार्‍यांचे हात, पाय उखडून टाका

राणे यांचे आवाहन || कर्जत शहरात तणावाचे वातावरण

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

यापुढील काळामध्ये हिंदूंनी अन्याय सहन करू नका. अन्याय करणार्‍यांचे हात आणि पाय उखडून टाका, तुमच्या केसालाही धक्का लागणार कारण आता सरकार हिंदूंची आहे आणि हा देश हिंदूंचा आहे, असे आवाहन आ. नितेश राणे यांनी केले. कर्जत शहरातील हनुमान मंदिर व सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये अन्य धर्मियांनी केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी कर्जत शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामुळे शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अक्काबाई मंदिरापासून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महिला युवक व पुरुष सहभागी झाले होते. ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन कापरेवाडी वेस येथे अतिक्रमण केलेल्या हनुमान मंदिर परिसरामध्ये मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी चांगलाच तणाव त्याठिकाणी निर्माण झाला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. यानंतर मोर्चा बाजारतळ येथे गेल्यावर त्याचे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले.

सभेत राणे म्हणाले, हा देश हिंदूंचा आहे. या देशावर सत्ता ही हिंदूंचीच राहील आणि या देशावर हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. याचप्रमाणे पुढील काळामध्ये देखील राहावे लागणार आहे. अन्यथा हे हिरवे साप कधीही त्यांचा विळखा सर्व हिंदूंना घालून आपले गाव परिसर आणि देश यामधून आपल्याला बाहेर काढण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.

पोस्टर बॉयचे ऐकू नका
यावेळी आ. राणे यांनी नाव न घेता आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली. अधिकार्‍यांनी पोस्टर बॉय याचे ऐकून त्या धर्मियांना विनाकारण संरक्षण देऊ नका. सरकार देशात आणि राज्यात भाजपचे आहे हे विसरू नका. जर पुढील काही दिवसांमध्ये हे अतिक्रमण काढले नाही तर मी स्वतः याठिकाणी येऊन बुलडोझर लावून हे अतिक्रमण दूर करेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील. आणि तो पोस्टर बॉय आडवा आला तर त्याला देखील सरळ करू,असा इशारा राणे यांनी दिला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...