Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrashant Koratkar : "तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता"; भाजप...

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”; भाजप आमदार फुकेंचा आरोप, वडेट्टीवारांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून अटक केली. त्यानंतर आज त्याला कोल्हापूरच्या कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी भाजप आमदार परिणय फुके (MLA Parinay Phuke) यांनी गंभीर आरोप करत “तेलंगणात प्रशांत कोरटकर एका काँग्रेस नेत्याकडे लपून बसला होता. त्याला वाचवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तेलंगणातील काँग्रेस नेत्याच्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे”, असा दावा केला. त्यावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फुके यांचा हा दावा खोडून काढला.

आमदार परिणय फुके काय म्हणाले?

परिणय फुके म्हणाले की, “प्रशांत कोरटकर हा तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात सापडला. त्याला काँग्रेसच्या (Congress) नेत्याने आश्रय दिला होता. माझा आरोप आहे की महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यात सामील आहेत. येथील काही नेत्यांनी सांगितले की कोरटकरला कोणत्या मार्गाने तेलंगणात नेले. गडचिरोलीमार्गे त्याला कशा पद्धतीने तेंलगणात नेले ही माहिती ज्या लोकांनी दिली तेच लोक यात सहभागी आहेत. हे सगळं महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी केले जात आहे. हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाने कोरटकरला एक महिन्यापासून संरक्षण दिले होते. महायुतीच्या सरकारला (Mahayuti Government) बदनाम करण्याचा त्यांचा कट होता”, असे त्यांनी म्हटले होते.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

फुके यांनी केलेल्या दाव्यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की,”काँग्रेसचा याच्याशी काहीच संबंध नाही. कोरटकर हे भाजपाचेच पाप आहे. पोलीस कोरटकरला जाऊन भेटले. त्यांना माहिती होते की कोरटकर कुठे लपला आहे. पोलिसांनी चंद्रपुरात जाऊन त्याची सेवा केली. यावरून स्पष्ट आहे की तो पोलिसांच्या बुरख्याखाली लपून वावरत होता. त्याला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केले पाहिजे. त्याला तडीपार केले पाहिजे. भाजपावाले स्वतःचे पाप लपवायला काँग्रेसचे नाव घेत आहेत. फुके यांना असे वाटत असेल तर त्याचे सर्टिफिकेट घेऊन यावे. तो नेता कुठल्या पदावर होता, कोण होता, त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये कधी झाली? आपले पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचे. तुमचं तोंड कोरटकर उघडत नाही, तुम्ही काय काँग्रेस नेत्याचे नाव घेत आहत”, असे म्हणत विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी फुके यांना सुनावले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...