Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Prakash Solanke : "राजकीय विरोधकांनी माझ्या घरावर हल्ला केला"; आमदार प्रकाश...

MLA Prakash Solanke : “राजकीय विरोधकांनी माझ्या घरावर हल्ला केला”; आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

बीड | Beed

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये (Beed) अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच आता या प्रकरणावर सोळंके यांनी भाष्य करत विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे…

- Advertisement -

Assembly Elections Results 2023 : चार पैकी भाजपची तीन तर कॉंग्रेसची एका राज्यात आघाडी

यावेळी बोलतांना सोळंके म्हणाले की, माझ्या घरावर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली त्यामागे राजकीय विरोधकांचा हात असू शकतो असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नाही, असेही सोळंके यांनी म्हटले आहे. तर माझ्या घरावर हल्ला झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यात इतर समाजाचे देखील लोक आहेत. त्यावेळी अवैध धंदे आणि राजकीय विरोधकांनी कट रचून माझ्यावर हल्ला केला असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. तसेच यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला.

शब्दगंध : ‘अवकाळी’चा फेरा

तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आव्हान केलेले असताना देखील काही लोकांनी माझ्या घरावर दगडफेक जाळपोळ केली. या प्रकरणानंतर माझ्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना वाईट सांगितले जात आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी इतरांचे ऐकून जाहीर सभेमध्ये माझ्याबद्दल वक्तव्य करू नये, अशी विनंती देखील आमदार प्रकाश सोळंके यांनी जरांगे यांना केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

NCP Crisis : “अजित पवारांची भूमिका…”; ‘त्या’ गौप्यस्फोटाबाबत शरद पवार स्पष्टच बोलले

- Advertisment -

ताज्या बातम्या