Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअजितदादांचं कुटुंब आता वेगळं…; रोहित पवारांचं मोठं विधान

अजितदादांचं कुटुंब आता वेगळं…; रोहित पवारांचं मोठं विधान

मुंबई | Mumbai
बारामतीच्या राजकारणात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडलेले आहेत. दोन गट पडल्यामुळे पवार कुटुंबात दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये काहीजण अजित पवारांबरोबर तर काहीजण शरद पवारांच्या बरोबर आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत, असे म्हटले होते. आज रोहित पवार यांनी पवार कुटुंबाबाबत बोलताना मोठे विधान केले आहे. अजितदादा यांचं कुटुंब आता वेगळे आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलेय.

रोहित पवार काय म्हणाले?
“केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली नाही. पण प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली. मी जिल्हा परिषद सदस्य असताना दुसरे कोणतेही पद माझ्याकडे नव्हते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना इतर लोकांच्या जवळच्या नेत्यांना संधी दिली गेली. पण मला तेथे पद नव्हते. मात्र, आम्हीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. कारण आमची सुरुवात होती. त्यानंतर आम्ही संघर्ष करत आहोत”, असे रोहित पवारांनी म्हटले.

- Advertisement -

पुढे ते असे ही म्हणाले की, “अजित पवार यांचा दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी घरच्याच व्यक्तीला राज्यसभेची खासदारकी देण्याचा निर्णय घेतला असावा”, असे रोहित पवार म्हणाले. “त्यांच्या पक्षातील नेते कुठेतरी काहीतरी कुजबूज करत असतील. म्हणून त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहिला नसेल. कुणावरही विश्वास राहिला नसल्यामुळे राज्यसभा पद घरच्याच व्यक्तीला दिले तर योग्य ठरू शकते. पण आता अजित पवार यांचे कुटुंब वेगळे आहे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळे आहे”, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

घराणेशाहीवर टीका करणारी व्यक्ती फक्त..
घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवरही आमदार रोहित पवार यांनी चांगलंच तोंडसुख घेतले. “आता टीका करणारे लोक कोण आहेत? टीका करणारी व्यक्ती फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. दुसऱ्या बाजूने अनेक कुटुंबांना फोडून ते आपल्यासोबत घेतात. यामध्ये विखे पाटील कुटुंब, पवार कुटुंब, मुंडे कुटुंब असे अनेक कुटुंब आपल्याला दिसतील. सर्वात जास्त घराणेशाही आपल्याला भाजपमध्ये दिसेल. घराणेशाहीचा विषय तेच काढतात आणि नेत्यांनाही तेच घेतात. त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे”, अशी टीका रोहित पवारांनी भाजपावर केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Immigration and Foreigners Bill 2025: भारत देश धर्मशाळा नाही! इथे अशांतता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकोणीही वाटेल तेव्हा भारतात येऊन राहायला, हा देश धर्मशाळा नाही. व्यापार, शिक्षण व संशोधनासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. मात्र,...